सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

नक्षी ....पावसाळी भेट

आषाढ महिन्याची आज ३ तारीख.
अर्थात 'आषाढ चॅलेंज' या डोंबिवली सायकलिंग क्लब च्या उपक्रमाचा ३ रा दिवस.

उन्हाळ्यातील 'बिट द हीट' या २१ दिवसांच्या उपक्रमाप्रमाणेच पावसातील 'आषाढ चॅलेंज'  (#Ashadhchallange) या ३१ दिवसांच्या उपक्रमातही Arnav Kulkarni आणि गन्धार डोम्बिवलीकर या दोघांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

सौर आषाढ १ ला हा उपक्रम सुरु झाला मात्र त्या दिवशी #डोंबिवलीतेठाणे (#Dombivli to #Thane) या #cycle2work प्रवासात पावसाने हुलकावणी दिली. त्याच दिवशी परतीची राइडलाही वरूणराजाने साथ दिली नाही.

आज सुट्टी असल्याने डोंबिवली शिळ डोंबिवली अशी राईड करायची ठरवली. Ritesh Savla आणि इतर सर्वजण लवकर जाणार होते, मी मात्र उशिराने निघालो. रस्ते पावसाने चिंब झाले होते. वाटेत पावसाचे शिंतोडे उडायला सुरुवात झाली होती.
परवाचा अनुभव असल्याने रेनकोट घेतला नव्हता. पावसात भिजत राईड करायचे ठरवले आणि पाऊस अंगावर घेत कल्याण शिळ रस्त्याला लागलो. एव्हाना थोडाफार भिजलो होतोच. पाऊस अजून येईल याची वाट पाहत शिळ कडे सायकल दामटवली.
गंधारने आजच हिंदू धर्माचा ४ था महिना आषाढ (ज्याच्या नावावरून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरच्या महिन्याचे नाव ठरवले गेले) सुरु झाल्याचे कळवले होते.
जरी सकाळी ८ नंतर प्रतिपदा असली तरी सुर्योदयावेळी अमावस्या असल्याने आजची तिथी अमावस्याच असल्याने हिंदू धर्मानुसार आषाढ खरेतर उद्या सुरु होईल.
उद्या सूर्योदया आधीच प्रतिपदा संपून सूर्योदयाच्या वेळी द्वितीया असल्याने उद्या ची तिथी द्वितीया असेल आणि प्रतिपदचा क्षय असेल(म्हणजे कोणत्याही दिवशी आषाढ प्रतिपदा असणार नाही).

असो. चांद्र आषाढ महिन्याचे स्वागत पाऊस जोरदार करेल असे वाटत होते. शिळ रस्त्यावर जागोजागी दुचाकींना चाकावर लावण्यासाठी कव्हर उपलब्ध होती. पाऊस जेमतेम असला तरी बरेचजण तेथे कव्हर लावून घेत होते.

शिळ फाटा येथे पोचून मी परत फिरलो. पण वरुण राजा काही प्रसन्न होत नव्हता. मात्र अरुणही त्रास देत नव्हता हीच समाधानाची बाब.

पाऊस पडेल याची वाट पाहत मी मानपाडा रस्त्या ऐवजी मी थोडा लांबून पेंढारकर कॉलेज कडून सायकल आणली. मात्र वरुण काही प्रसन्न झाला नाही.

मनसोक्त भिजायला न मिळाल्याने नाखुषीने घरी पोचलो आणि ....

पाहतो तर काय... वरुण राजाने भिजू दिले नाही तरी माझ्या कपड्यांवर फर्मास नक्षी काढून दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...