सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

खरी कमाई

तुम्ही रोज काय आणि किती कमावता?

TJSB HOUSE मधून निघता निघता श्विनने क्षुधाशांती आटोपली. दोन्ही टायर टम्म झाल्यावर श्विन सफारीसाठी तयार झाली. दिवसभर एका जागी थांबून कंटाळल्यामुळे, ऑफिस सुटल्यावर श्विनने लगेच वेग घेतला. तसेही ऑफिसमधून निघताना थोडा उशीर झाला होता आणि श्विनच्या पोटपूजेतही थोडा वेळ गेला होता.

श्विन ऑफिसबाहेर पडत असताना वर्षाराणीने काही थेट शिंपडून आमचे स्वागत केले. मग मात्र माजीवाडा नाक्यावरील पुलापर्यंत श्विन भरधाव पोचली.
दुर्दैवाने आज पुलावर वाहतूककोंडी झाली नव्हती. त्यामुळे उधळलेल्या सर्व अश्वशक्तीधारी वाहनांना मन देत श्विनला उजवीकडे नाशिक रस्त्याला लागण्यासाठी वाट पहावी लागली.

पुढेही वाहनांची गर्दी लोढा साईमन्दिरापर्यंत नव्हती. पुढे मात्र  सर्व वाहनांची ढकलगाडी सुरु झाली. त्या वाहनांमधून वाट काढत पुढे जात असताना एक सायकलिस्ट शिरस्त्राण, सायकल क्लबचा T शर्ट आणि शॉर्ट अशा पेहरावात दिसला. मग त्याला follow करत कल्याण रस्त्याला लागलो.

तिथल्या गर्दीत वाट काढत पुढे एकमेकांना समांतर येत आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. वारकरी समाजाप्रमाणे सर्व सायकलिस्टची एकच ओळख असते. तिथे ना कोणी कमिशनर असतो ना कोणी झाडूवाला.
सर्व सायकलिस्ट जात, धर्म, देश, लिंग, वय, पद या आणि अश्या सर्व भेदांपलीकडे एकाच पातळीवर असतात... ते म्हणजे ते सर्व 'सायकलिस्ट' असतात.

श्विनमुळे रोजच नवीन ओळख होत होती. मग तो #powaipedals चा Johnson Minj असो, की काल नावही न कळलेला मोटोरसायकलिस्ट असो की आज ओळख झालेला Nitin Suryawanshi.

गप्पा मारता मारताच कळले की नितिनने BRM च्या एकदोन नव्हे तर तब्बल १० स्पर्धा पार केल्या आहेत.
माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तोही रोज कल्याण ते ठाणे #cycle2work करतो. नितीन, त्याचा एक मित्र आणि मी तिघांची ऑफिसहून परत निघण्याची वेळही एकाच असल्याचे समजल्याने उद्यापासून एकत्रच येऊ असे ठरवत आम्ही दुर्गाडिपाशी एकमेकांचा निरोप घेतला.

श्विनमुळे जॉन्सन, काल भेटलेला मोटारसायकलिस्ट, ऑफिसमधील सफाई कामगार, ऑफिस कॅन्टीनमधील कामगार आणि आज भेटलेला नितीन अशी माझी खरी कमाई रोजच वाढत होती. श्विनमुळे माझी अशी खरी कमाई रोजच होत आहे. तुम्ही रोज किती आणि काय कमावता.

#cyclingzens #ismartcommute #tjsbbank #dombivlicyclingclub #saveoursahyadri #bikesport

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...