#shravanchallange day 12. Scientific solar date Bharatiy Saur Shravan 12,shake 1939
श्विनला #cycle2work साठी तयार करत होतो, तोच श्रावनसरींनी आमचे स्वागत केले. अर्थातच काही क्षणातच त्या शांतही झाल्या. मात्र तरीही आभाळ काळ्या ढगांनी आच्छादलेलेच होते.
नेहमीप्रमाणेच डोंबिवली, ठाकुर्ली पार करून नवीन कल्याण रोडला पोचलो. तेवढ्यात पुढे एक सायकलिस्ट जात असलेला दिसला. समव्यसनी दिसल्यावर ओळख तर व्हायलाच हवी ना! पुन्हा पुन्हा विचारून त्याचे नाव विसरलो. पण त्याचे आडनाव लोखंडे मात्र लक्षात राहिले. तो कल्याणला मेट्रो मॉल जवळ लोकग्राम मध्ये राहत असल्याचे समजले.त्याच्याबरोबर राइड करता करता त्याला #dombivlicyclingclub (DCC) ची माहिती देऊन त्याला येत्या रविवारी संडे राइडचे आमंत्रणही दिले.
@ritesh savala काही महिन्यांपूर्वी मला इथेच भेटला होता. त्यालाही मी असेच आमंत्रण दिले होते. थोड्याच अवधीत तो DCC चा सर्वात नियमित सभासद झाला आहे.
लोखंडे नवीन कल्याण रस्त्यावरील ओपन जिम पाशी थांबला. श्विन आणि मी मात्र पुढे निघालो. गोविंदवाडी बायपास वरील चार पाच तिहेरी आणि तेवढेच एकेरी गतिरोधक ओलांडून दुर्गाडी पुलापाशी पोचलो, तोच वरूनराजाने हुलकावणी दिली. पण त्याचा कावा ओळखून मी शांतपणे पुढे जात राहिलो.
पुढे टोल नाका जवळ आला, तिथे रस्त्यात वीतभर लांबीपासून १० फुटापर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या तळ्यांची मालिकाच सुरु झाली. अर्थातच श्विनचा वेग मंदावला. खरेतर, टोल का देऊ नये याचा भक्कम पुरावाच टोल नाक्याच्या दोन्ही बाजूला हजर होता.
रांजनोली येथून नाशिक ठाणे महामार्गावर वळलो आणि हिरव्या रंगाने लक्ष वेधून घेतले. हा महामार्ग कोपर वसई रेल मार्गावरून जातो, तिथून डाव्या बाजूला ९० अंशात मान वळवली क्षितिजावर डोंबिवली दिसत होती. तर रस्त्यात पुढे डाव्या बाजूला हिरवी टेकडी अन उजव्या बाजूला खिंड होती. तिथे फोटोसेशन करून मानकोलीला पोचलो.
मानकोली सोडताच लांबवर डावीकडे मुंब्रा डोंगररांगा दिसतात. आजमात्र तिथे फक्त काळा रंग दिसत होता. समोर ठाण्याच्या दिशेने पाहिले तर तिथेही काळे क्षितिज.
आज श्रावणाचे काय बिनसले असा विचार करीत मी बॅग मधून रेनकोट काढला. मी रेनकोट घालेपर्यंत, लगेचच श्रावणाची सर धावत आली. आषाढाचा जोर नसला तरी समोरील क्षितिजाचा रंग पाहून मी तयारीतच होतो. मानकोली इथे सुरु झालेल्या श्रावणसरी खारेगाव टोल नाका येईपर्यंत मला ताजातवाना करतच होत्या. '...क्षणात फिरुनी ऊन पडे'चा काही पत्ता नव्हता.
मात्र #tjsb bank च्या मुख्य कार्यालयापर्यंत श्रावणसरींनी माझी साथ काही सोडली नाही.
#saveoursahyadri #cyclingzens #ismartcommute

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा