सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

राष्ट्रीय कॅलेंडर

सौर आषाढ महिन्याची आज ७ तारीख. डोंबिवली सायकल क्लब (#dombivlicyclingclub ) च्या 'आषाढ चॅलेंज' (#ashadhchallange) चा ही अर्थातच ७ वा दिवस.
आजही आषाढ चांगलाच प्रसन्न होता. आषाढ सरींनी छान जोर धरला होता. अश्या वेळी सायकलिंग करण्याचा आनंद खरोखरच अवर्णनीय! नेहमीप्रमाणे आजही नेवाळी फाट्याला जायचे ठरवले आणि सायकल दामटवायला सुरुवात केली. सुरुवातीलाच देवी चौक आणि नंतर चार रास्ता येथे ट्रॅफिक जॅम झाला होता. पुन्हा एकदा इतर सर्व वाहने अडकली असताना,  माझ्या 'श्विन'ने (shwinn) सहजगत्या मार्ग काढला.
भजनकीर्तनात जसे तल्लीन होता येते, तशीच अवस्था सायकलिंग करतानाही अनुभवायला येते. नेहमीप्रमाणेच मी स्वतःशी संवाद साधत होतो. पाइपलाइन रोडला वळल्यावर थोड्याच वेळात @gandhar दिसला. सायकल थोडी पुढे नेऊन मी परत वळलो.  गंधार पुन्हा भेटेल असे वाटत होते आणि तसेच झाले.
गंधारबरोबर Arnav Kulkarni होताच. त्यांच्याशी गप्पा मस्तच रंगल्या. अर्णवने भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरबद्दल विचारले आणि मग त्याला थोडक्यात माहिती दिली.
भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर वर्ष हे सुद्धा ख्रिस्ती वर्षाप्रमाणेच सौर वर्ष आहे, त्यामुळे हे वर्षही ३६५ वर्षांचे आहे. यातही लिपवर्ष असते. सूर्य उत्तर गोलार्धात शिरतो त्या दिवशी भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यानंतर १८५ दिवस सूर्य उत्तर गोलार्धात असतो म्हणून चैत्र या पहिल्या महिन्यात ३० तर वैशाख हा दुसरा महिना ते भाद्रपद हा सहावा महिना या सलग महिन्यात प्रत्येकी ३१ दिवस असतात. तर सूर्य दक्षिण गोलार्धात १८० दिवस असतात तेव्हा शेवटचे ६ महिने असल्याने या शेवटच्या सलग ६ महिन्यात प्रत्येकी ३० दिवस असतात. लीप वर्षात चैत्र या १ लय महिन्यात ३१ दिवस असतात. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय वर्ष हे पूर्णपणे शास्त्रीय (scientific), निधर्मी (secular), आणि अत्यंत सोपे असे कॅलेंडर वर्ष आहे. हे राष्ट्रीय कॅलेंडर वर्ष असल्याने हे कॅलेंडर सर्व व्यावसायिक आणि शासकीय कामकाजात वापरणे याला भारतीय घटनेअंतर्गत (constitution) मान्यता आहेच. किंबहुना रिझर्व्ह बँक आणि सर्व शासकीय कार्यालयात भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर प्रमाणे तारीख लिहिली जाते.
#cyclingzens #ismartcommute #tjsbbank #cycle2work

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...