सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

जॉन्सन मिन्ज... एका अवलियाशी ओळख

शनिवार दिनांक भारतीय सौर श्रावण १४, शके १९३९
 #cycle2work केल्यावर #office2homecycleride ओघानेच आली.
दिवसभर पाऊस नसल्याने रस्ते कोरडे होते. त्यामुळे श्विन खुशीत होती. त्यातही माजीवाडा नाक्यावरील कल्याण/नाशिककडे वळणाऱ्या पुलावर वाहतूककोंडी झाल्यामुळे श्विन सर्व वाहनांना पार करीत आरामात नाशिक रस्त्याला लागली. सर्व स्वयंचलित वाहने श्विनपेक्षा कमी गतीने जात असल्याने पुलावरून उजवीकडे वळण्यास श्विनला कोणतेही वाहन आडकाठी करू शकत नव्हते.
नाशिक रस्त्यालाही श्विन वेगात पुढे निघाली. पावसाअभावी  रस्त्यामध्ये पडलेले (राखलेले) वीतभर ते ५-१० फुटांचे तलाव मात्र ओस पडले होते. अगदी खारेगाव टोलपुढील पुलावरही सरकारी कृपेने असे तलाव दिसत होते. या सगळ्या तलावांना वळसा घालून श्विन मार्गक्रमण करत होती.
माणकोली पुढील चढ संपून उतार सुरु होताच नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांची लांबच लांब रांग दिसू लागली. मग मात्र श्विनने नाशिक महामार्गाऐवजी पिंपळास कोनागाव रस्त्याचा पर्याय निवडला. त्या रस्त्यावर अपेक्षित असलेले खड्डे आठवून मन घट्ट केले आणि उजवी दिशा पकडली. पण इतक्यात काही स्वयंचलित दुचाकी नाशिक रस्त्याने पण विरुद्ध दिशेने जाताना दिसल्यावर श्विनने पुन्हा विचार बदलून त्या दुचाकीस्वारांपाठोपाठ मार्ग पत्करला. सुमारे २ किमी पर्यंत लागलेली रांग बाजूला ठेवून रांजनोली नाक्यावर श्विनने कल्याणकडे मोर्चा वळवला.
तेथून जेमतेम एक किमी अंतर पार होत नाही तोच एक सायकलिस्ट हेल्मेट घालून सायकल हातात घेऊन जाताना दिसला.
अश्या वेळी श्विन न थांबली तरच नवल. तो होता Powai Pedals चा Johnson Minj. ह्या निमित्ताने त्याच्याशी ओळख झाली. एव्हाना संध्याकाळचे सात वाजले होते. जॉन्सन ५.३० वाजल्यापासून सायकल रिपेअर करण्यासाठी दुकान शोधत होता. तो पवईहून निघून माळशेज घाटात पोचून रात्री ट्रेक करून उद्या सकाळी मुंबईत परतणार होता. मात्र त्याच्या सायकलने पुढे जाण्यास नकार दिल्याने बिचारा हताश झाला होता.
त्याला या ठिकाणची माहिती नव्हती. पण कल्याण ५-६ किमी अंतरावर आहे असे वाटून तो चालत निघाला होता.
अश्या अडचणीच्या वेळी मला पहिले नाव आठवते ते विलास उर्फ Gajanan Keshav Vaidya चे. माझ्या माहितीप्रमाणे जवळचे दुकान म्हणजे Durgesh Zipre चे. विलासनेही तेच सांगितले. मग मात्र जॉन्सनला रिक्षा करून दिली आणि कोनगावात थांबायला सांगितले.
रिक्षा नजरेआड होऊ नये म्हणून पाठोपाठ श्विन निघाली. श्विनने वेग कायम राखला आणि कोनगावात रिक्षापाठोपाठच श्विन पोचली. तिथून पुढे दुर्गाडी पूल पार करेपर्यंत सर्व वाहने कुर्मगतीने जात होती. श्विन, मी, जॉन्सन आणि त्याची सायकल पुलावरील पायवाटेने झपाझप दुर्गाडी चौकात पोचलो.
दुर्गेशच्या दुकानात जाईपर्यंत जॉन्सन चे अंतरंग उलगडले. BRM च्या २०० किमी, ३००किमी, ४००किमी आणि ६०० किमी अश्या चारही स्पर्धा त्याने एका वर्षात पूर्ण केल्या होत्या. तेही एकदा नव्हे तर दोनदा. त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने या स्पर्धा रोड बाईक किंवा हायब्रीडने नव्हे तर MTB (Mountain bike) ने पूर्ण केल्या होत्या.
२०० किमी  अंतराची BRM जास्तीत जास्त १३.५ तासात पूर्ण करायची असते, तर ६०० किमी ची BRM ४० तासात पूर्ण करावी लागते. तुमची झोपसुद्धा या ४० तासातच समाविष्ट असते.
दुर्गेशाच्या दुकानात गेलो तर तो आमची वाट पाहताच होता. विलासपाठोपाठ मी त्याला आम्ही येणार असल्याचे कळवले होते. दुर्गेशच्या करामती ऐकताच जॉन्सन थक्कच झाला. दुर्गेशने तयार केलेली ३सीटर tandem सायकल, मोटार बाइक प्रमाणे दिसणारी रॉकी, हाफ बाइक, फोल्डिंग सायकल अश्या दुर्गेशच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहून तो थक्कच झाला.
सायकल बिघडल्यामुळे माळशेजला जाता आल्याचे शल्य दूर होऊन अभावितपणे तो म्हणाला, ' अच्छा हुआ मेरे सायकलको प्रॉब्लेम हुआ'. मग मी, दुर्गेश आणि जॉन्सनने ३सीटर तांडेम सायकलवर एक फेरफटका मारला. रॉकी आणि हाफ सायकल चालवण्याची हौसही जॉन्सनने पूर्ण करून घेतली.
एव्हाना माळशेज ऐवजी पुन्हा मुंबईला जाण्याचा निर्णय जॉन्सनने घेतला होता.
मग दुर्गेशने नेटाने काम करून जवळपास ९.३०- ९.४५ ला मी आणि जॉन्सन पुढे निघालो.
दुर्गाडीहून गोविंदवाडी बायपासमार्गे आम्ही पत्रिपुलापाशी आलो. पत्रिपुल ओलांडल्यावर जॉन्सनला शिळफाटा-महापे-आयरोली-मुलुंड मार्ग समजावून मी उजवीकडे ठाकुर्ली - डोंबिवली कडे वळलो. अखेरीस ऑफिसहून निघून घरी पोचेपर्यंत ४ तासांचा प्रवास झाला असला तरी जॉन्सन बरोबर झालेल्या ओळखीचे मोल/ संचित मोठे होते

#cyclingzens #ismartcommute #dombivlicyclingclub #tjsbbank

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...