भारतीय राज्यघटनेवर आधारित आणि शास्त्रीय सौर कॅलेंडरच्या वर्ष १९३९ च्या श्रावण महिन्याची आज ३ तारीख. अर्थातच #shravanchallange चा ३ रा दिवस.
राईडसाठी तयार होत असताना अचानक वरूनराजाने रौद्र रूप धारण केले. मग त्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मी सुद्धा रेनकोटरुपी चिलखत आणि शिरस्त्राण चढवले.
श्विनला तयार करून निघालो मात्र आणि नित्यनियमप्रमाणे वरूनराजाने वरुणास्त्र म्यान केले. माझा चिलखत आणि शिरस्त्राण चढवण्याचा खटाटोप वाया गेला तरी, श्विन मात्र बाहेर फिरायला मिळणार म्हणून खुश होती.
#कल्याणडोंबिवली महानगरपालिका (#kalyandombivlimunicipality), येथील सर्व आजी आणि माजी नगरसेवक , स्थापत्य अभियंते (civil engineers) यांच्या कृपाप्रसादामुळे श्विनला बिल्डिंगबाहेर पडल्यापासूनच रस्त्यावर जपून ठेवलेल्या सौंदर्यस्थळांचा (खड्डयांचा) लाभ मिळायला सुरुवात झाली.
#दीनदयाळ रस्ता (#dindayal road) चे नुकतेच काँक्रिटिकरण करण्यात आले, मात्र #सम्राट चौक (#samrat chowk) येथे चहुबाजूने खड्डयांची महिरप जपण्याचे कौशल्य मात्र उल्लेखनीय आहे. तसेच सम्राट चौकापुढे रस्ता २ इंच तुटल्यासारखा ठेवल्याने सर्व वाहनांना रस्त्यावर उडी मारण्याचा आनंदही घेता येतो.
मात्र श्विन ने ही उडी आणि खड्डयांची महिरप टाळून पुढे मार्ग काढला.
मानपाडा रस्ता संपता संपता पुन्हा एकदा गाय आणि वासरू यांचा कळप समोरून येत होता. मी सायकल चालवता चालवता त्यांची त्यांची संख्या मोजायची प्रयत्न केला. पण श्विन आणि तो कळप विरुद्ध दिशेने जात असल्याने तो प्रयत्न फोल गेला तरी २०-२५ जणांचा तो कळप नक्कीच होता. कोणतेही घड्याळ न वापरता त्यांना वेळ कशी समजते कोणास ठाऊक!
पुढे बदलापूर पाइपलाइन रोडला लागल्यावर श्विनने छान वेग पकडला. श्विनला तर तोच रस्ता पकडून सरळ जात रहावेसे वाटत होते. मात्र घड्याळ माझ्या मनगटावर नसले तरी मानगुटीवर होते. त्यामुळे श्विनचे मनसुबे आवरते घेत, मी श्विनची दिशा बदलली.
मग मात्र श्विनचा वेगही मंदावला. पाइपलाइन रोडवर 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे' चा प्रत्यय येत होता. मग श्विनचे लक्ष तिकडे वळवत तिचा पुढे जाण्याचा मनसुबा मी आवरता घेतला होता याचे भानही उरले नाही.
परतीच्या वाटेवर मात्र #KDMC ला लाजवेल अश्या नजाकतीने रस्त्यावर खड्डयांची नक्षी जपली होती. जर कोणी कर्जत- बदलापूर कडून डोंबिवली कडे येत असेल तर त्याला आधीच डोंबिवली येत असल्याचे लक्षात यावे यासाठी तर MMRDA (का आणखी कोणी) ने हा उपक्रम केला नसेल ना!
#saveoursahyadri #tjsbbank #cyclingzens #ismartcommute

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा