सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

गुरुपौर्णिमा

आज गुरुपौर्णिमा. त्या निमित्ताने दत्त मंदिरात जाण्याची पर्वणी DCC ने साधली हे उत्तमच.
या निमित्ताने माझ्या काही सायकल गुरूंविषयी...
मला आठवते त्याप्रमाण माझ्या मामेबहिणी मला जवळपास तीन वर्ष होप्पिंग चा प्रयत्न करत सायकल शिकवत होत्या.
मात्र मी होपिंग च्या पुढे काही जात नव्हतो.
शेवटी माझ्या मावसभावाने मला आधी सायकलवर बसवले आणि मला पॅडल मारायला सांगून माझ्याबरोबर धावत येत सायकलला स्पीड दिला. त्याने हात कधी सोडला ते कळले नाही, पण वळणावर मला लक्षात आले तेव्हा सायकल थांबवायची कशी ते न कळल्याने मी बाजूच्या झाडीत घुसवण्याचा पर्याय निवडला.
तेव्हा हे माझे पहिले तीन गुरु.
नंतर ११-१२ व्या इयत्तेत मला मिळालेली सायकल मी २० वर्ष चालवल्यावर मी ती देऊन टाकली. मग दोनच वर्षात मधुमेह हा मित्र आणि गुरू भेटला. त्याने व्यायामाचे महत्व पटवले.
दरम्यानच्या काळात माझी मावशी- डॉ निरुपमा भावे नी पन्नाशीनंतर पुन्हा सायकलिंग सुरु करून सायकलवर भारतातील बहुतेक भागात सायकलिंग केले होते.
तिला मी सहजपणे मला सायकल घेण्याविषयी सांगितले. माझे सहज सांगणे तिने मनावर घेतले आणि मला सायकल घेऊन दिली. तिचे घर डेक्कन (पुणे) ला तर मी राहत होतो चिंचवडला. रेल्वे स्टेशनवर नियम नीट न सांगितल्याने आणि मावशीने सांगितल्याप्रमाणे मी ते २० किमी अंतर सायकलनेच पार केले आणि माझे सायकलिंग पुन्हा सुरु झाले. हि माझी पहिलीच गियर सायकल. तेव्हा मावशीच्या मार्गदर्शनाप्रमाणे सायकलिंग सुरु केले. पुणे सायकल प्रतिष्ठान तर्फे इंदोर झांसी प्रवास २०१० मध्ये केला तेव्हा जुगल राठी या आणखी सायकल गुरूशी भेट झाली. शेवटच्या दिवशी खजुराहो ते झांसी हे १८० किमी अंतर राठींनी एकट्यानेच पूर्ण केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे ६२. (आजही ६९-७० व्या वर्षी त्यांच्यात दरदिवशी २०० किमी सायकलिंग ची जिद्द आहेच.)

त्यानंतर प्रत्येकच लॉन्ग टूर च्या निमित्ताने वेगवेगळे सायकल गुरू भेटतच राहिले.
आप्पा (धनंजय मदन) बरोबर असले किंवा नसले तरी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे. त्यांना भेटण्याची दोन मिनिटांची संधी मिळाली तरी त्यात अप्पा सहजपणे महत्वाचा सल्ला देतात.
YHAI मधील प्रमोद बोरकर, किशोर केणी तसेच saveoursahyadri मधील प्रशांत ननावरे, आशिष आगाशे, सुमित पाटील हेही सायकलिंग मधील माझे गुरुच.

गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व सायकल गुरूंना सादर प्रणाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...